ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 44 हजार 684 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 520 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 87 लाख 73 हजार 479 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 29 हजार 188 एवढी आहे.
शुक्रवारी दिवसभरात 47,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 4 लाख 80 हजार 719 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 81 लाख 63 हजार 572 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.
देशात आतापर्यंत 12 कोटी 40 लाख 31 हजार 230 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 29 हजार 491 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.13) करण्यात आल्या.









