ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील 24 तासात 1 लाख 41 हजार 986 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, उपचारार्थ रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 72 हजार 169 एवढी आहे. काल दिवसभरात 40 हजार 895 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा डेली पॉझिटिव्हीटी रेट 9.28 टक्के आहे.
देशात आतापर्यंत 3 कोटी 44 लाख 12 हजार 740 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 4 लाख 83 हजार 463 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. देशाने 150 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे.
दरम्यान, देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्णही वाढत आहेत. आतापर्यंत 27 राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून, एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3071 एवढी आहे. त्यापैकी 1203 जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.









