ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 9987 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 331 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2 लाख 66 हजार 598 वर पोहचली असून, मृतांची संख्या 7466 एवढी आहे. जगात कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत सध्या सहाव्या स्थानावर आहे.
सध्या देशात 1 लाख 29 हजार 917ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 29 हजार 215 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 88 हजार 528 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली 29 हजार 943, तामिळनाडू 33 हजार 229, गुजरातमध्ये 20 हजार 545, मध्यप्रदेश 9638, आंध्र प्रदेश 4851, बिहार 5202, राजस्थान 10 हजार 763, उत्तरप्रदेश 10 हजार 947 तर पश्चिम बंगालमध्ये 8613 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.









