ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 94 हजार 372 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1114 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 47 लाख 54 हजार 357 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 78 हजार 586 एवढी आहे.
सध्या देशात 9 लाख 73 हजार 175 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 37 लाख 02 हजार 576 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 5 कोटी 62 लाख 60 हजार 928 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 71 हजार 702 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली.