ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन संक्रमितांच्या आकड्यापेक्षा मोठी आहे.मंगळवारी 1 लाख 62 हजार 664 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2 कोटी 75 लाख 04 हजार 126 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
92,596 नवे रुग्ण
देशात मागील 24 तासात 92 हजार 596 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2219 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 2 कोटी 90 लाख 89 हजार 069 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 3 लाख 53 हजार 528 रुग्ण दगावले आहेत.
आतापर्यंत देशातील 23.90 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे.









