उच्च क्षमतेची सेवा दिल्याचा रेलटेलचा दावा
नवी दिल्ली
देशभरामध्ये आता जल्ळपास 6100 रेल्वे स्थानकांवर उच्च प्रतीची मोफत वायफाय इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती यावेळी रेलटेल यांनी दिली आहे.
यामध्ये उत्तर रेल्वेमधील लखनऊ येथे उभारण्यात आलेल्या स्थानकात वायफाय सुविधा चालू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा जवळपास 6100 स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंंतर्गत येणाऱया रेलटेलने देशभरातील सर्व स्थानकांवर या सुविधा पोहोचविण्यासोबत विस्तार केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
अधिकची स्थानके ग्रामीण भागात
प्रामुख्याने रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय इंटरनेट सुविधा सादर करण्याची योजना 2015 च्या रेल्वे अर्थसंकल्पात मांडण्यात आली होती. तोच आधार पकडत हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. सध्या 6100 स्थानकांमधील 5000 पेक्षा अधिक स्थानके ग्रामीण क्षेत्रातील आहेत.









