नवी दिल्ली ः
देशात आतापर्यंत 19 राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंट पसरला असून 578 जणांना बाधा झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण बाधितांपैकी 151 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे आतापर्यंत देशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून अन्य राज्यांमध्येही आता बाधितांची संख्या हळूहळू वाढत आहे. कोरोनास्थितीचा विचार करता, रविवारी दिवसभरात देशात 6 हजार 531 नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच 315 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या चोवीस तासात 7 हजार 141 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे आता सक्रिय रुग्णांचा आकडा 75 हजार 841 पर्यंत खाली आला आहे.









