ऑनलाईन टीम / मुंबई :
देशाच्या परकीय चलन गंगाजळीत 58 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. परकीय चलनाच्या राखीव साठा सध्या 461.21 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. भारतीय चलन साठय़ात आतापर्यंतचा परकीय चलन गंगाजळीचा हा उच्चांक आहे.
परकीय चलन वाढले असले तरी परकीय चलनासंबंधी मालमत्तेत मात्र, घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पत्रकानुसार, 10 जानेवारीच्या संपलेल्या आठवडय़ाअखेर परकीय चलन गंगाजळीत 58 दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. तर त्याआगोदरच्या आठवडय़ात ही वाढ 3.689 अब्ज डॉलरची होती. परकीय चलनासंबंधी मालमत्तेत मात्र, 367 दशलक्ष डॉलरची घसरण झाली असून ती 427.582 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली आहे.









