नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनापूर्वी देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. सीएए-एनआरसी आणि कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात सक्रिय असलेल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर संस्थेने दिल्ली पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर लाल किल्ला आणि नवी दिल्ली परिसरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आल्याचे एका वरि÷ सुरक्षा अधिकाऱयाने सांगितले. दिल्ली हिंसाचारात सहभागी असलेले लोक प्रजासत्ताक दिन सोहळय़ात व्यत्यय आणू शकतात, असे इंटेलिजन्स इनपुट्स सध्या प्राप्त झाले आहेत. तसेच दहशतवादी हल्ल्याचा धोकाही कायम असल्यामुळे दिल्लीसह देशातील सुरक्षा यंत्रणांना सुसज्ज करण्यात आले आहे.
दिल्ली हिंसाचारात सक्रिय असलेले काही लोक देशातील सामान्य स्थिती अस्थिर करण्यासाठी असामाजिक घटकांच्या संपर्कात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या कटाला बळ देण्यासाठी शीख फॉर जस्टिस (एसएफजे) आणि इतर दहशतवादी संघटनांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यामुळेच सतर्कतेमध्ये कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आपापल्या भागात बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या निषेधार्थ 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ट्रक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारामुळे ‘प्रजासत्ताक दिना’ला गालबोट लागले होते. या हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
दिल्लीत 27 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी
गुप्तचर यंत्रणेच्या सतर्कतेनंतर लाल किल्ल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. 25 ते 26 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून दिल्लीच्या सीमा सील केल्या जातील. 26 जानेवारी रोजी अवजड वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 27,713 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी रविवारी सांगितले. दहशतवादविरोधी कारवाईसाठी सर्व शक्मय पावले उचलली जात आहेत. एकूण दलात 71 पोलीस उपायुक्त (डीएसपी), 213 एसीपी, 713 निरीक्षक, दिल्ली पोलीस कमांडो, सशस्त्र बटालियन अधिकारी आणि जवान आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 65 कंपन्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.









