ऑनलाईन टीम / मुंबई :
विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे फडणवीस यांनी मंत्र्यांकडे तीन मागण्या केल्या आहेत.
यामध्ये रेशन कार्ड नसलेल्या अन्नधान्य द्या, कोरोला विरोधात लढणारे डॉक्टर व नर्स यांना महत्त्वाची साधन सामुग्री तत्काळ उपलब्ध करून द्या आणि तब्लिगी संदर्भात कोणताही अभिनिवेश न बाळगता कारवाई करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे या पत्रात फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.









