सोलापूर : प्रतिनिधी
तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यावर अज्ञात चोरट्यांनी घर फोडले आणि सोन्या चांदीच्या दागिन्यासह 9 लाख 91 हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना दि. 15 ते 16 फेब्रुवारी या दरम्यान घडली.
लक्ष्मी आंबादास कंदीकटला (वय 42, रा. न्यु पाच्छा पेठ, सोलापूर) या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. परिवारासह तिरूपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून आणि घरातील सोन्याच्या अंगठ्या, मंगळसुत्र, लक्ष्मीहार, चेन, पदक, सोन्याची खड्याची अंगठी, असा सोन्याचा आणि रोख 45 हजार रूपये असा एकूण 9 लाख 91 हजाराचा ऐवजावर चोरट्याने डल्ला मारला. या चोरीची फिर्याद लक्ष्मी कंदीकटला यांनी जेलरोड पेालीस ठाण्यात दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.









