वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मार्च 2021 मध्ये समाप्त होणाऱया आर्थिक वर्षामध्ये जीडीपी वाढण्याचे संकेत असल्याचा अंदाज स्टेट बँकेच्या संशोधन अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी हा अंदाज अंतिम सहामाहीत आर्थिक वृद्धीदर -7 टक्के सकारात्मक राहणार असल्याचे म्हटले आहे.
या अगोदरच्या आर्थिक वर्षात -7.4 टक्क्यांची वाढ राहणार असल्याचा अंदाज मांडला होता. पहिल्या सहामाहीत ही वाढ -15.7 टक्क्यांवर राहिली होती. दुसऱया सहामाहीत 2.8 टक्क्यांची वाढ राहण्याची शक्यता आहे.
इंडिया रेटिंग्स ऍण्ड रिसर्च यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपी वाढ 10.4 टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज मांडला आहे. रेटिंग एजन्सीने दिलेल्या अंदाजानुसार जीडीपी वाढीमध्ये भक्कम रिकव्हरी आर्थिक वर्ष 2023 पर्यंत होणार आहे.
तिमाही अहवालाचा होणार लाभ आतापर्यंत आलेल्या कंपन्यांच्या तिमाही अहवालाचा लाभ होणार असून यातूनच आर्थिक उलाढालींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये 1,129 कंपन्यांची ग्रॉस व्हॅल्यू डिसेंबर तिमाहीत 14.7 टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर तिमाहीत 3,758 कंपन्यांची ग्रॉस व्हॅल्यू वाढीसह 8.6 टक्क्यांवर राहिली होती.









