निफ्टीची झेप 15 हजारच्या जवळपास ः एचडीएफसीचे समभाग मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतामुळे स्थानिक बाजारातील वातावरण उत्साही राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये भारतीय भांडवली बाजारातील सेन्सेक्स 280 अंकांनी वधारला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागांत विक्रीचा कल राहिला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर दिवसअखरे बीएसई सेन्सेक्स 280.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 50,051.44 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 78.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,814.75 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी वधारला आहे. यासोबतच इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टायटन, ऍक्सिस बँक, स्टेट बँक आणि मारुती सुझुकी यांचे समभाग वाढीसोबत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला ओएनजीसी, पॉवरग्रिड, आयटीसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि एचडीएफसीचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर आशियातील शांघाय, हाँगकाँग, टोकीओ आणि सिओल या बाजारात घसरण राहिली होती. युरोपीयन बाजार प्रारंभी नकारात्मक कल राहिला.
अन्य घडामोडींचा प्रभाव
शेअर बाजारामध्ये आर्थिक कंपन्यांच्या समभागांचे समर्थन मिळाल्याने देशातील शेअर बाजारात तेजीचा माहोल राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. कारण मागील सप्ताहातील प्रभाव राहण्याची चिंता अभ्यासकांनी व्यक्त केली होती. परंतु जागतिक पातळीवरील घडामोडीच्या प्रभावाने भारतीय शेअर बाजारात उत्साह राहिल्याचे दिसून आले आहे.








