प्रतिनिधी/विटा
खानापूर तालुक्यात वादळी पाऊस सुरू सुरूच आहे. गुरुवारी सकाळी उपग्रह छायाचित्र वादळाचा केंद्र खानापूर दाखवत असल्याने आणखी पावसाची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले आहे. दरम्यान तालुक्यात आत्तापर्यंत विक्रमी 1 हजार 258 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
रविवारपासून खानापूर तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी दिवसभर तालुक्याच्या सर्वच भागात पावसाने शंभरी गाठली. विट्यासह अपवाद वगळता तालुक्यातील सर्वच भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विट्यात आत्तापर्यंत एकूण 1 हजार 258 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विट्यात बुधवारी एका दिवसात 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. लेंगरे येथे 104 मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी आत्तापर्यंत एकूण 886 मिलिमीटर पाऊस झाला आहे. करंजे येथे 101 मिलिमीटर पाऊस झाला. या ठिकाणी आत्तापर्यंत एकूण 1 हजार 114 मिलिमीटर पाऊस झाला आहे. भाळवणी येथे 106 मिलिमीटर तर एकूण 737 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. खानापूर येथे रविवारी 104 मिलिमीटर तर एकूण 944 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी सकाळी उपग्रह छायाचित्र वादळाचा केंद्र खानापूर दाखवत असल्याने आणखी पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी मुसळधार पावसात अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी केले आहे.