सातारा : सातारा शहरातील केसरकर पेठेतून चोरीला गेलेली केटीएम दुचाकी सातारा शहर पोलिसांनी स्वारगेट, पुणे येथून ताब्यात घेत चोरट्याला अटक केली.
संतोष अशोक उपाध्ये (वय 23 रा. मंगळी कॉलनी, शाहूनगर सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 10 ऑगस्ट रोजी सागर जितेंद्र शिंदे (रा. 51 केसरकर पेठ सातारा) यांच्या मालकीची केटीएम दुचाकी क्रमांक (एम एच 11 सी यू 75 16) ही त्यांचा राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने रात्री दीड ते पहाटे सहा दरम्यान चोरून नेली. सातारा शहर पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली होती. त्याप्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला.
संबंधित गुन्ह्याच्या तपासाबाबत सातारा शहर पोलिसांनी चोरीस गेलेल्या वाहनाचे तपशील सर्वत्र चौकशीसाठी पाठवले होते. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत ही दुचाकी संतोष उपाध्ये याच्याकडे असल्याबाबत सातारा शहर पोलीस स्टेशनला पुणे पोलीसांकडून कळविण्यात आले. त्याप्रमाणे सातारा पोलिसांनी पुणे येथून चोरीस गेलेली दुचाकी व आरोपी उपाध्ये यांना सातारा येथे घेऊन आले. आरोपीवर गुन्हा रजि क्र. कलम 745/ 2021 भा द, वि, स कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हवालदार दबडे करत आहेत.