अक्षय कुमारकडून छायाचित्र प्रसारित
बॉलिवूडचा ऍक्शन हीरो अक्षय कुमार स्वतःच्या चित्रपटांमुळे नेहमीच व्यस्त असतो. त्याच्याकडे अनेक मोठे चित्रपट असून त्यांचे चित्रिकरण लवकरात लवकर संपविण्यावर त्याचा भर असतो. अक्षयने अलिकडेच ‘राम सेतू’ या चित्रपटाचे दमण-दीवमधील चित्रिकरण पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर त्याने एक सुंदर छायाचित्र प्रसारित करत याची माहिती दिली आहे.

अक्षयने स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवर स्वतःचे छायाचित्र शेअरकरत दीवमधील अद्भूत आठवणींना पुन्हा उजाळा दिला आहे. या छायाचित्रात अभिनेत्यामागील दृश्य अत्यंत सुंदर दिसून येते. नैसर्गिक सौंदर्य, प्रेमळ लोक, प्रसिद्ध पानी कोठा किल्ला-जेल पाहणे विसरू नका, हे स्थान इतिहासात कोरलेले एक अविश्वसनीय रत्न असल्याचे अक्षयने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.
अक्षयने या चित्रपटाचा पहिला हिस्सा ऊटीत चित्रित केला होता. तर चित्रपटाचा मोठा हिस्सा श्रीलंकेत पूर्ण केला जाणार होता, पण तेथे अनुमती न मिळाल्याने दीवमध्ये चित्रिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अक्षयसोबत या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा दिसून येणार आहे. तसेच अभिनेता सत्यदेवही महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत असून हा चित्रपट पुढील वर्षी 24 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.









