वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे सुरु असलेल्या विश्व पुरुष आणि महिलांच्या मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा मुष्टीयोद्धा दीपक भोरियाने 51 किलो वजन गटात उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना कजाकस्तानच्या सॅकेन बिबीसिनोव्हचा पराभव केला.
रविवारी झालेल्या 51 किलो वजन गटातील या लढतीत दीपक भोरियाने कजाकच्या बिबीसिनोव्हचा 5-2 अशा गुणांनी पराभव केला. त्याचप्रमाणे भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीनने 57 किलो वजन गटातील लढतीत रशियाच्या सॅव्हिनचा 5-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दीपक भोरियाचा पुढील फेरीतील सामना चीनच्या जियामाओशी होणार आहे.









