दुसऱया टप्प्यातील काम लवकरच
प्रतिनिधी /वाळपई
वाळपई होंडा दरम्यानच्या रस्त्याची हॉटमिक्सद्वरा डांबरीकरण पुन्हा एकदा सुरू झालेले आहे .पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण सुरू झाले असून चार दिवसांमध्ये ते पूर्णत्वास येणार आहे. पहिल्या टप्प्यातील डांबरीकरण यासाठी जवळपास दीड कोटी खर्च करण्यात आला असून होंडा प्रमुख जंक्शन ते भुईपाल पर्यंत डांबरीकरण पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसऱया टप्प्यातील डांबरीकरणाला प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सुरुवात होणार असल्याची माहिती वाळपई रस्ता विभागाच्या सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयाची प्रमुख राजधानी म्हणून समजल्या जाणाऱया वाळपई ते होंडा दरम्यानचा रस्ता डांबरीकरण करून त्याचे रुंदीकरण करण्यात येणार होते.
या कामाला जवळपास दीड महिन्यापूर्वी सुरुवात झाली होती. होंडा जंक्शन ते भुईपाल पर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आला होता. यामुळे रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होणार आहे. यासाठी जवळपास दीड कोटी खर्च करण्यात आला असून चार किलोमीटरचा हा रस्ता सध्या तरी हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे काम सुरू झालेले आहे .सदर काम पहिल्या टप्प्यातील असल्याची माहिती वाळपईच्या रस्ता विभागाच्या सूत्रांकडून उपलब्ध झालेली आहे. यामुळे आता होंडा ते भुईपाल दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित व रुंद झाल्यामुळे वाहतूक आराम पद्धतीने करता येणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना वाळपई रस्ता विभागाचे अधिकारी देवेंद्र वेलिंगकर यांनी सांगितले की यासाठी जवळपास दीड कोटी खर्च करण्यात आलेला आहे. होंडा ते वाळपई दरम्यानचे दोन टप्प? करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील कामाला 2019 साली मान्यता मिळाली होती. त्यानंतर या कामाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी जवळपास दीड कोटी खर्च करण्यात आला असून रस्ता रुंदीकरण व त्यावर हॉटमिक्स द्वारा डांबरीकरण करण्याचे काम सुरू झालेले आहे .चार दिवसांमध्ये हे काम संपुष्टात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले .यामुळे सदर रस्ता आता वाहतुकीसाठी सुरक्षित व सोयीस्कर होणार असल्याचे वेलिंगकर यांनी पुढे बोलताना सांगितले. या रस्त्याच्या रुंदीकरणात कामाचा शुभारंभ दीड महिन्यापूर्वी करण्यात आला होता. सदर पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱया टप्प्यातील कामाला काही दिवसांनी सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले. भुईपाल ते वाळपई दरम्यानच्या दुसऱया टप्प्यातील कामाला मान्यता मिळालेली आहे. मात्र काम सुरू करण्याचा आदेश अजून पर्यंत मिळालेल्या नाही .सध्या आचारसहिता असल्यामुळे अजून पर्यंत संदर्भात आदेश मिळालेला नाही. आचारसंहिता संपल्यानंतर यदाकदाचित सदर आदेश मिळाल्यानंतर लवकरच दुसऱया टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे .हा रस्ता डांबरीकरण करण्यात आल्यानंतर होंडा ते वाळपई दरम्यान हे चांगल्या प्रकारचा प्रवासाचा सुखद अनुभव प्रवाशाना घेता येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यासाठी विशेष प्रयत्न केले होते. महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून वाळपई भागातील प्रवाशांना पणजी मापसा आदी ठिकाणी जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत असतो .यामुळे या रस्त्यावर काही प्रमाणात खड्डे पडले होते .परिणामी या रस्त्याची दुरूस्ती ताबडतोब करण्यात यावी अशा प्रकारची मागणी वारंवारपणे करण्यात येत होती .नागरिकांच्या मागणीचा सारासार विचार करून रस्ता विभागाच्या अधिकाऱयांनी आवश्यक त्या ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते .यामुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला होता.









