मोठय़ा प्रमाणात खरेदीला उधाण : व्यापारी-विपेत्यांतून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा दिवाळीत नागरिकांनी दणक्मयात खरेदी केली आहे. त्यामुळे बाजारात कोटय़वधींची उलाढाल झाली. कोरोनामुळे दोन वर्षे बाजारपेठेवर संकट ओढविले होते. मात्र निर्बंधमुक्त दिवाळी साजरी झाल्याने खरेदीला उधाण आले होते. त्यामुळे यंदाच्या दिवाळीबाबत व्यापारी-विपेत्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मागील आठवडय़ाभरापासून बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीची रेलचेल सुरू होती. विशेषतः रांगोळी, किराणा बाजार, फराळ, मिठाई, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदी, पणती, दिवे, कपडे आदींच्या माध्यमातून उलाढाल वाढली. त्यामुळे दोन वर्षांच्या संकटानंतर यंदाची दिवाळी सर्वांनाच उत्साही ठरली आहे. कोरोनाकाळात सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे बाजारपेठा ओस पडल्या होत्या. दरम्यान व्यापारी-विपेत्यांसमोर अडचणी वाढल्या होत्या. मात्र कोरोनानंतर यंदाची दिवाळी विविध साहित्यांनी बहरली होती. त्याचबरोबर खरेदीदेखील वाढली होती. त्यामुळे दोन वर्षांच्या काळानंतर यंदाच्या दिवाळीत उलाढालही कोटय़वधी रुपयांवर पोहोचली आहे.
वसुबारसपासून दिवाळीला प्रारंभ झाला. त्यानंतर धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन यानिमित्ताने पूजेचे साहित्य, फळे-फुले, ऊस आणि झेंडूंच्या फुलांची विक्री वाढली होती.
त्यामुळे पूजेच्या साहित्यांतूनही मोठी उलाढाल झाली आहे. मंगळवारी सूर्यग्रहण असल्याने बाजारपेठ थंड होती. मात्र दुसऱया दिवशी म्हणजेच पाडव्यादिवशी बाजारात दुपटीने गर्दी वाढली होती. त्यामुळे पाडवा आणि भाऊबिजेच्या पार्श्वभूमीवर बाजारात उलाढाल वाढली. विशेषतः सराफ, इलेक्ट्रॉनिक, दुचाकी शोरूम आणि मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी वाढली होती. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या खरेदीतून मोठी उलाढाल झाल्याचे स्पष्ट होत आहे.
दिवाळीसाठी विशेष आकर्षण असलेल्या पणत्या, दिवे आणि आकाशकंदिलांची खरेदी वाढली होती. त्याचबरोबर फराळदेखील मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात आला. शिवाय दिवाळीची भेट म्हणून सुकामेवा आणि मिठाई खरेदीही झाली. नवीन कपडे खरेदीलाही पसंती दिली गेली. त्यामुळे दिवाळीच्या सणातून उलाढाल वाढल्याचे दिसून आले.
जोरदार खरेदी…
- यंदाच्या दिवाळीत खरेदीची रेलचेल वाढली
- बाजारपेठेत सर्वच वस्तूंना मोठी मागणी
- पाडव्याला दुप्पट उलाढाल
इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह नवीन वाहनांची खरेदी
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱया पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात नवीन वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. संगणक, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, इन्व्हर्टर यासह दुचाकी आणि चारचाकी वाहनांचीदेखील खरेदी अधिक झाली. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनांच्या खरेदीतून मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली.
सोने-चांदी खरेदी
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदी केली जाते. त्यामुळे पाडव्यादिवशी सराफ दुकानांमध्ये गर्दी झाली होती. त्याचबरोबर सोने-चांदी खरेदीतून मोठी उलाढाल झाली.









