वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 36 लाख 24 हजार 613 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्ये उच्चांकी 79 हजार 457 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 960 जणांनी जीव गमावला आहे. देशात सध्या 7 लाख 81 हजार 975 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 27 लाख 74 हजार 802 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 64 हजार 469 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे.
30 ऑगस्ट रोजी देशात 8 लाख 46 हजार 278 नमुन्यांची चाचणी केल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सोमवारी दिली आहे. याचबरोबर देशात आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 7 हजार 914 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी एम्समधून डिस्चार्ज करण्यात आले आहे. 55 वर्षीय शाह यांना पोस्ट कोविड केयरसाठी 18 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. गृहमंत्र्यांना अंगदुखी, थकवा आणि चक्कर येण्याची तक्रार जाणवत होती.









