ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 220 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 38 हजार 593 वर पोहचली आहे. यामधील 1,169 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 188 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 26 हजार 519 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,905 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 21 लाख 92 हजार 675 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 41,260 आरटीपीसीआर टेस्ट आणि 22,738 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.









