ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दिल्लीमध्ये मंगळवारी एका दिवसात 500 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कालच्या दिवशी 265 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 हजार 554 वर पोहचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आता पर्यंत एकूण 4 हजार 750 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आहे. तर 166 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 5638 ॲक्टिव केस मधील 1779 रुग्ण विवध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील 158 रुग्ण आयसीयूमध्ये तर 16 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
दिल्ली सरकारने आता पर्यंत 10 लाखमधील 7052 लोकांची तपासणी केली असून दिल्लीत सध्या कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्के आहे. तर मृत्युदर 1.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, दिल्लीतील रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण राज्याच्या सरासरी पेक्षा चांगले आहे. राज्यात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 38 टक्क्यांच्या आसपास आहे. तर दिल्लीत हेच प्रमाण 45 टक्के आहे.









