ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात केवळ 111 नवे रुग्ण आढळून आले असून 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कालच्या दिवशी 702 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, राजधानीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 33 हजार 366 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 06 हजार 629 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.15 % इतका आहे. तर आतापर्यंत 24,940 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- राजधानीत सध्या 4,340 झोन
सद्य स्थितीत 1 हजार 797 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 09 लाख 75 हजार 900 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 52,940 आरटीपीसीआर टेस्ट आणि 23,245 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 4,340 झोन आहेत.
- लसीकरणाचा डाटा
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 84,812 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 65,970 जणांना पहिला डोस तर 18,842 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 66 लाख 95 हजार 944 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 50,79,306 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 16,16,638 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.