ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रोज नवे नवे उच्चांक गाठत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील 24 तासात 20,160 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 17,364 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 10 हजार 231 वर पोहोचली आहे. तर संक्रमणाचा दर 23.34 % इतका झाला आहे.

त्यातच मागील 24 तासात 332 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 19,071 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राजधानीत आतापर्यंत 12 लाख 03 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत 87 हजार 907 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 77 लाख 51 हजार 509 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 62,921 आरटीपीसीआर टेस्ट आणि 11,463 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 51,338 झोन आणि 971 कंट्रोल रूम आहे.









