आज 12 कोरोनाबाधित रुग्णांची भरएकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 23, 561 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. जमादार यांची माहिती
6070 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात शनिवारी एकाच दिवशी 707 रुग्ण बरे होऊन परतले. दरम्यान आज 316 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 192 पुरुष, 124 स्त्रियांचा समावेश आहे. आज 12 तर आतापर्यंत 645 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 23 हजार 561 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 70 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2497 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील2181 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 316 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 23 हजार 561 रुग्णांपैकी 14 हजार 526 पुरुष, 9 हजार 35 स्त्री आहेत. आतापर्यंत 645 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 16 हजार 846 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे :
अक्कलकोट 1011, मंगळवेढा 1090, बार्शी 4326, माढा 2359, माळशिरस – 3811, मोहोळ 984, उत्तर सोलापूर – 672, करमाळा 1783, सांगोला 1693, पंढरपूर 4593, दक्षिण सोलापूर – 1239, एकूण 23, 561
होम क्वांरटाईन – 4667
एकूण तपासणी व्यक्ती- 1764137
प्राप्त अहवाल- 176305
प्रलंबित अहवाल- 109
एकूण निगेटिव्ह – 157744
कोरोनाबाधितांची संख्या- 23, 561
रुग्णालयात दाखल – 6070
आतापर्यंत बरे – 16,846
मृत – 645









