- मागील 24 तासात प्रदेशात 61 नव्या रुग्णांची नोंद
ऑनलाईन टीम / देहरादून :
प्रदेशात आता कोरोना संसर्गासोबतच मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. मागील 24 तासात एका रुग्णांचा मृत्यू तर 61 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. दिलासादायक म्हणजे सात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर एकूण रुग्णांची संख्या 96, 129 इतकी आहे. यातील 91,966 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 7,133 नमुने निगेटिव्ह आले आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये 61 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. देहरादून जिल्ह्यात 28 रुग्ण आढळले. तर हरिद्वारमध्ये 12, नैनिताल 10, उधमसिंह नगर 9, रुद्रप्रयाग आणि चंपावतमध्ये एक रुग्णांची नोंद झाली. तर अल्मोडा, बागेश्वर, चमोली, पौडी, पिथोरागड, टिहरी आणि उत्तरकाशी मध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1644 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.67% इतके आहे.









