साहित्य : 1 लाल कांदा चिरून, 4 ते 5 कढीपत्ता पाने, 1 टोमॅटो चिरून, पाव चमचा हळद पावडर, चवीपुरते मीठ, पाव चमचा काळीमिरी पावडर, 1 चमचा बटर, 1 वाटी दही
कृती : कांदा आणि टोमॅटो अगदीच बारीक न चिरता त्याच्या मध्यम फोडी कराव्यात. गरम पॅनमध्ये बटर टाकावे. नंतर त्यात कांदा सेकंदभर परतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून चांगला परतवून घ्यावा. आता त्यात हळद पावडर, मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून मिश्रण मिक्स करावे. वरून कढीपत्ता पाने टाकावीत. आच मंद करून मिश्रण मिक्स करून त्यावर झाकण ठेवावे. मिश्रण छान वाफलेले दिसले की परतवावे. आच बंद करून मिश्रण थोडे गार होण्यास ठेवावे. नंतर तयार तडका दहीवर ओतावे. आता तयार दही तडका जेवणासोबत खाण्यास द्या.
टीप : दही तडका बनविण्यासाठी दही किंचित गार व शक्यतो थोडे जाड असावे. दही जास्त आंबवलेले न वापरता ताजे वापरावे.









