श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा, बडगाम येथे चकमकी सुरू असतानाच शुक्रवारी श्रीनगर येथे पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पोलिसांना वीरमरण आले आहे. श्रीनगरमधील बाराजुल्ला परिसरात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान गोळीबार करणाऱया एका संशयित युवकाला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही सापडले असून अन्य हल्लेखोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलीस कर्मचाऱयांचे एक पथक शुक्रवारी विमानतळाला श्रीनगर शहराशी जोडण्यासाठी बनवण्यात येणाऱया रस्त्याच्या सुरक्षेसाठी तैनात होते. याचदरम्यान हल्लेखोर दहशतवादी शेजारच्याच एका गल्लीतून आले आणि त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले होते. त्यांना तातडीने इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दहशतवादी एके-47 घेऊन दबा धरून आहे. तो तेथील मुख्य बाजारातही शस्त्र घेऊन फिरताना दिसत आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवून त्याला शोधण्याची मोहीम राबवली जात आहे. या दहशतवाद्याच्या जोडीला अन्य एक दहशतवादीही दिसत आहे. यापूर्वी 17 फेब्रुवारी रोजीही असाच दहशतवादी हल्ला करण्यात आला









