वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू ख्रिस मॉरीसने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून आपल्या निवृत्तीची घोषणा मंगळवारी केली. मॉरीसने 2012 च्या डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरूद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच त्याने 2013 साली पहिला वनडे सामना खेळला होता. मॉरीसने 2016 साली कसोटी क्रिकेटमध्ये आपले पदार्पण इंग्लंडविरूद्ध केले होते. त्याने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत चार कसोटी, 42 वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले असून त्याने 2019 साली आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.









