प्रतिनिधी / कोल्हापूर
राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात मृत झालेल्या जनावरांचा मृत्यू हा पशुखाद्या खाल्ल्याने झालेल्या नाही. असा स्पष्ट अहवाल पुणे येथील प्रयोग शाळेने गुरुवारी दिला आहे. उष्माघातासह अन्य कारणाने हा मृत्यू झाल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी सांगितले. दरम्यान हा मृत्यू ही नैसर्गिक आपत्ती आहे. ही जानिव ठेवून संबधित शेतकऱयांना गोकुळकडून भरीव आर्थिक मदत करण्यात येणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.
गेली आठ दिवसात आजर, चंदगड, राधानगरी तालुक्यात सुमारे 30 जनावरांचा मृत्यू झाला, यामध्ये म्हैशींचा अधिक समावेश आहे. एकाच वेळी इतक्या मोठय़ा संख्येन जनावरे दगावल्याने जिल्हय़ात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे गोकुळ यंत्रणाही हडबडली होती. चेअरमन रविंद्र आपटे यांनी तातडीने पावले उचलत या जनावरांची वैद्याकिय तपासणी करुन घेतील अधिक तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत नमुने पाठवले. दरम्यानच्या काळात जिल्हा पशुसंवर्धन विभागानेही गांभिर्याने घेत हालचाली केल्या.आज रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाला. पशुखाद्याने ही जनवरे दगावली नाहीत. असा स्पष्ट अहवाल प्रयोग शाळेने दिल्याने गोकुळने सुटकेचा निश्वास सोडला आहे.








