तैपैई
तैवानच्या हवाई सुरक्षा क्षेत्रात चीनने दुसरी सर्वात मोठी घुसखोरी केली आहे. तैवानच्या सुरक्षा क्षेत्रात चीनच्या 30 लढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. या पार्श्वभूमीवर तैनाने हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. तसेच चीनच्या हालचालींवर पूर्णवेळ नजर ठेवली जात असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. चीन मागील वर्षापासून तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. जानेवारीनंतर चीनकडून घुसखोरीचा हा दुसरा मोठा प्रयत्न ठरला आहे. तैवान हा आपला हिस्सा असल्याचा चीनचा दावा आहे.









