कोलकाता :
पश्चिम बंगालमधील सत्तारुढ तृणमूल काँग्रेसविरोधात नाराजी व्यक्त करणाऱया बीरभूमच्या खासदार शताब्दी रॉय यांना पक्षाने प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच शताब्दी यांनी स्वतःची नाराजी समाजमाध्यमांवर मांडल्यावर त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली होती. शताब्दी यांनी समाजमाध्यमांद्वारे जनतेला संबोधित केले होते. मी जनतेला भेटू इच्छिते, परंतु काही लोकांना हे नको आहे. कार्यक्रमांची माहितीच दिली जात नसेल तर मी तेथे कशी जाणार, असे विधान करत शताब्दी यांनी तृणमूलवर नाराजी व्यक्त केली होती. अभिषेक बॅनर्जी (ममता बॅनर्जी यांचे भाचे) यांच्यासोबत बोलणे झाले आहे. मी तृणमूल काँग्रेससोबतच राहणार आहे, असे शताब्दी रॉय म्हणाल्या होत्या.









