मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कारवाई
कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. याचदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित प्रकरणामध्ये माजी खासदार के.डी. सिंग यांना अटक केली आहे.
सिंग हे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार राहिले आहेत. कारवाईनंतर तृणमूलने सिंग यांचा पक्षाशी आता कुठलाच संबंध नसल्याचा दावा केला आहे. सिंग यांच्या कंपनीने पश्चिम बंगालमधील लाखो लोकांची आर्थिक फसवणूक केली होती. सिंग यांनीच नारदा कंपनीला पुरस्कृत केले होते. शासकीय यंत्रणेने सिंग यांची मालमत्ता जप्त करुन लोकांचे पैसे परत करावेत अशी मागणी भाजप नेते शुभेंदु अधिकारी यांनी केली आहे. ईडीने यापूर्वी सिंग यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यादरम्यान अनेक आवश्यक कागदपत्रे, विदेशी चलन आणि रोख रक्कम सापडली होती.









