वार्ताहर / पंढरपूर
बिरोबा देवस्थानासमोरील जुन्या पध्दतीचा सभामंडप का पाडला ? असे म्हणत काठी व दगडाने मारहाण केल्याची घटना तुंगत ता. पंढरपूर येथील बिरोबा देवस्थान येथे बुधवारी सकाळी घडली आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अंकुश विठ्ठल काळे याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिंसाकडून मिळालेल्या माहितीनूसर यातील फिर्यादी बिरोबा मंदिर येथे आला होता. यावेळी अंकुश काळे याने महादेव देवकर यांना कोणास विचारुन जुना सभामंडप पाडला असे म्हणत लाकडी काठीने डोक्याच्या डाव्या बाजूस मारहाण केली. तसेच डाव्या हाताच्या कोपराजवळ दगड मारुन जखमी केले आहे. घटनेचा पुढील तपास बाबर हे करीत आहेत.
जनमानसातून तळमळ व्यक्त
बिरोबा देवस्थानच्या पुजेचा व सेवा करण्याचा मान गावातील धनगर समाजास आहे. यातील काहि लोकांनी मंगळवार दि.16 रोजी बिरोबा देवस्थानसमोरील सभामंडप पाडला होता. बुधवारी पाडलेल्या सभामंडपाची दगडे व माती वाहनांच्या सहाय्याने भरुन नेली जात हेाती. यावेळी अंकुश काळे यांनी वाहतुक बंद पाडली होती. तुंगत ग्रामस्थांचे ग्रामदैवत म्हणुन लोकांच्या भावना मंदिरासमोरील सभामंडपाशी जोडल्या गेल्याने जनमानसातून तळमळ व्यक्त केली जात आहे. सभामंडपाचा वाद सामोपचाराने मिटावा अशी सुजाण नागरिकांमधून भावना व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार
पुरातन काळातील बिरोबाचे मंदिर आहे. मंदिराचे सभामंडप चार ते पाच लोकांनी पाडल्याचे समजले आहे. यामध्ये समाजबांधव व ग्रामस्थांना विचारात घेतले नाहि. ग्रामपंचायतकडेसुध्दा विचारणा झाली नाहि. नुकसानीविरोधात पुरातत्व विभाग,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. भावना दुखावलेल्या नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करणार आहोत.
डॉ.पंकज लामकाने – तुंगत ता.पंढरपूर
नविन सभामंडप मंजूर झाला आहे.
बिरोबा देवस्थानसमोरील जुना सभामंडप जिर्ण झाला होता. नविन सभामंडपासाठी तुंगत ग्रामपंचायतीच्यावतीने बिरोबा देवस्थानाचा ग्रामीण तिर्थक्षेञ विकासमध्ये समावेश व्हावा यासाठी जिल्हा परिषद सोलापूर यांना पञ दिले होते. त्यानुसार जि.प.सदस्य सुभाष माने यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण तिर्थक्षेञ विकासामध्ये बिरोबा मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.त्यानुसार ग्रामीण तिर्थक्षेञ विकासाअंतर्गंत बिरोबा देवस्थानासाठी नविन सभामंडप मंजूर झाले आहे. आगतराव रणदिवे – सरपंच, तुंगत ता.पंढरपूर