प्रतिनिधी /पणजी
मेरशी येथील 600 मीमी. व्यासाच्या प्रमुख पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करण्यात येणार असल्याने आज दि. 7 आणि उद्या दि. 8 जुलै रोजी तिसवाडी तालुक्यात मर्यादित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सांताक्रूझ, सांत आंद्रे, ताळगाव हे संपूर्ण मतदारसंघ तसेच बांबोळीतील गोमेकॉ आणि सभोवतालच्या परिसरात मर्यादित स्वरुपात पाणीपुरवठा होणार आहे. काही परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरीही ग्राहकांनी याची नोंद घेऊन आवश्यक तेवढेच पाणी वापरावे व अनावश्यक अपव्यय टाळावा, असे साबांखातर्फे कळविण्यात आले आहे.









