काही गावात पाण्यासाठी भटकंती तर काही ठिकाणी अनेक योजना कुचकामी
प्रतिनिधी / बेळगाव
तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे पाणी समस्या भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचबरोबर काही गावात सुरू करण्यात आलेल्या अनेक योजना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात टँकरने पाणी पुरवठा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी पाणी झाले असले तरी उष्मा वाढत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
उन्हाच्या झळाही आता तीव्र होवू लागल्या आहेत. बेळगाव तालुक्मयातील काही गावांना वगळता अनेक गावात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सध्या क्लोजडाऊन सुरू झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. तालुक्मयातील पूर्व व उत्तर भागात पाणी समस्या अधिक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तर काहींनी वैयक्तिकरित्या टँकरने पाणी मागविण्यास सुरूवात केल्याची माहिती मिळाली आहे.
नियोजनाअभावी पाणी टंचाईची झळ
गेल्यावर्षी एका टँकरसाठी 500 हून अधिक रुपये मोजावे लागत होते. मात्र यावेळी अजून तरी टँकरचा दर निश्चित करण्यात आला नाही. त्यामुळे ज्या गावांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे अशा गावांमध्ये समस्या निर्माण होत आहे. तेव्हा आतापासूनच प्रशासनाने टँकरचा दर निश्चित करावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. तालुक्मयात काही ठिकाणी पाणी उपलब्ध असूनही नियोजन नसल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचे उघडकीस येत आहे.
ग्राम पंचायतीकडून योग्य प्रकारे नियोजन होत नाही. पाण्याची कमतरता असल्याने बऱयाच ठिकाणी पाणी उपलब्ध केले जात नाही. प्रथम पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत कसे टिकवता येईल, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. खानापूर तालुका सर्वात जास्त पाऊस पडणारा तालुका म्हणून ओळखला जातो. पण या तालुक्यामध्ये आतापासूनच पाणी समस्या निर्माण होत असल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यात केवळ एकमेव मार्कंडेय नदी आहे. पण त्या नदीत सांडपाणी जाऊन नदीतील पाणीही दूषित झाले आहे. मार्कंडेय नदी स्वच्छ आणि कचरा, ड्रेनेज मिश्रीत पाण्यांपासून अलिप्त ठेवल्यास याचा मोठा फायदा नदीकाठातील गावांना होवू शकतो. मात्र प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करुन आपल्या मनमानी कारभारतच धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. बेळगाव तालुक्मयातील ही अवस्था आणखी गंभीर होण्याची शक्मयता नाकारता येत नाही. त्या दृष्टिनेही प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.









