प्रतिनिधी / कोल्हापूर
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱया एकनाथ पाटील लिखित ‘तात्यांचा ठोकळा’ या पुस्तकाच्या 26 व्या आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दक्षता घेत साधेपणाने श्रीमंत शाहू महाराज आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला डॉ. वारके यांची प्रस्तावना लाभली आहे.
तात्यांचा ठोकळा हे पुस्तक राज्य लोकसेवा आयोगाची अर्थात एमपीएससीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. एकनाथ पाटील एमपीएससीचा विशाल अभ्यासक्रम डोळय़ासमोर ठेवून पुस्तकाची मांडणी आणि त्यामध्ये दरवेळी अपडेटस् करत असतात. यंदा 26 वी आवृत्ती तयार झाली. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशन सोहळा शक्य नव्हता. त्यामुळे श्रीमंत शाहू महाराज आणि डॉ. सुहास वारके यांच्या हस्ते साधेपणाने प्रकाशन करण्यात आले. यावेळी एकनाथ पाटील, सौ. अर्पणा पाटील, कु. पूर्वा पाटील, अर्णव पाटील, शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी उपस्थित हेते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱया माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी तात्यांचा ठोकळा हे पुस्तक नेहमीप्रमाणेच यशदायी ठरेल, असा विश्वास एकनाथ पाटील यांनी व्यक्त केला.








