अक्कलकोट / प्रतिनिधी :
अक्कलकोट तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या सपंर्कातील अधिकाऱ्याला कोरोना झाल्यामुळे तहसीलदार अंजली मरोड यानी स्वतःहून क्वारटांइन व्हावे असे शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार म्हणाले. कोरोनाचा प्रसार अक्कलकोट तालुक्यात दिवसेन दिवस वाढत आहे. संपर्कातील व्यक्तीचां शोध घेऊन क्वारटांइन केले जात आहे, त्यात लहान मुले सुध्दा आहेत. कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न केले जात आहे परंतु काल तहसील कार्यालयातील एका कर्मच्याऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे त्याचा संपर्क तहसिलदाराशी आला आहे, तसेच तहसीलदार हे अक्कलकोट मुक्कामी न राहता सोलापुर ये जा करतात , कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तहसिलदारानी स्वतःहून कोरोना चाचणी करुन घ्यावी त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाची साखळी तुटेल अन्यथा तालुक्यात कोरोना वाढण्याचा धोका आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालुन संबंधितांना क्वारटांन होण्याचे आदेश द्यावे असे योगेश पवार म्हणाले.
Previous Articleअंधश्रद्धेचा कहर : मेळघाटात चिमुकल्याच्या पोटावर विळ्याने चटके
Next Article हवाई दलाकडून 33 लढाऊ विमाने खरेदीचा सरकारला प्रस्ताव









