वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
मुंबईतील 2008 च्या दहशतवादी हल्ल्यातील संशयित आरोपी पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योजक तहव्वूर राणा याचा ताबा भारताकडे मिळण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकन सरकारच्या वकिलांनी संघराज्य न्यायालयात यासंबंधी माहिती दिली. राणा याचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी करताना ही माहिती त्यांनी दिली. मात्र, डेव्हिड कोलमन हेडली याला भारताच्या ताब्यात देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तहव्वूर राणा याला 10 जूनला लॉस एंजल्स येथे फेरअटक करण्यात आली होती. 2008 च्या मुंबई हल्ला प्रकरणी राणा याला ताब्यात देण्याची मागणी भारताने केली होती. 2008 च्या मुंबई हल्ल्याचे कटकारस्थान रचण्यात दहशतवादी संघटनांशी लागेबांधे असलेल्या हेडली आणि राणा यांचा सहभाग होता.









