अमेरिकेतील वृद्धांना लस घेतल्यावर प्रेमाचा शोध, 4270 किमी अंतर कापून विवाहासाठी पोहोचत आहेत
अमेरिकेत एकटे राहणारे वृद्ध कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर आता प्रेमाचा शोध घेत आहेत. ते आता स्वतःला पूर्णपणे सुरक्षित मानत आहेत. महामारीमुळे मागील वर्षी हे वृद्ध घरात एकटे राहत होते. एकाकीपणादरम्यान त्यांना जीवनात एका जोडीदाराची किती गरज आहे याची त्यांना जाणीव झाली.
दक्षिण अमेरिकेत राहणारे 60 वर्षीय स्टीफन पास्की यांनी 4270 किलोमीटरचे अंतर कापून कॅलिफोर्नियात राहत असलेल्या 57 वर्षीय मिस लेंज यांच्याशी 3 एप्रिल रोजी विवाह केला आहे. अमेरिकेत 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 80 टक्के वृद्धांना कोरोनाची लस मिळाली आहे. स्थिती आता सुरळीत होऊ लागल्याने एकटे राहणारे वृद्ध स्वतःचा तणाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर जोडीदार मिळवू इच्छित आहेत.
अमेरिकेत सध्या डेटिंग साइट्सवरही वृद्धांची संख्या 15 टक्क्यांनी वाढली आहे. 64 वर्षीय शिक्षिका कॅथरिन पॉमर यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्या दर शनारी डेटिंगवर मास्क घालून जातात. महामारीने प्रेम मिळविण्याची पुन्हा एक संधी दिली असल्याने वेळ वाया घालवू नये. मी पुन्हा असा तणावपूर्ण अनुभव सहन करू शकत नाही, याचमुळे एका जोडीदाराचा शोध घेत असल्याचे त्या सांगतात.
82 वर्षीय जिम ब्रॉयन, 63 वर्षीय एन. मास यांच्यासह अनेक वृद्ध एकाकीपणा टाळू इच्छित आहेत. महामारीच्या काळात वृद्धांनीच सर्वाधिक तणाव आणि एकाकीपणा सहन केला आहे. पण लस घेतल्यावर ते आता स्वतःला सुरक्षित मानत आहेत. त्यांच्यात जगण्याची इच्छा प्रबळ होऊ लागली आहे. हा खरोखरच चांगला संदेश असल्याचे उद्गार कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक जेफ गलक यांनी काढले आहेत.








