मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यातील ११ जिल्ह्यांत अजूनही कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्यामुळे तिसऱ्या गटातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टास्क फोर्स, तज्ज्ञांसोबत चर्चा करुन मुख्यमंत्री लोकलबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचे नियम पाळणं गरजेचे आहे. जर कोणी बाहेर निघताना कोरोना नियमांचे पालन करत नसेल, कोण मास्क वापरत नसले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लोकांनी कोरोना नियमांचे कडक पालन केले पाहिजे, लोकलसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाही म्हटलं नाही त्यांनी तुर्त हे प्रकरण होल्डवर ठेवले असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दोन कोरोना लसीचे डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. परंतू याचे परिणाम मुख्यमंत्र्यांना बघावे लागतात जर का ही मागणी मान्य केली तर कोरोना नियंत्रणात कसा राहिल. त्याच्याबाबतीत चर्चा करण्याची गरज आहे. प्रत्येकाने दोन डोस घेतले आहेत का याची पडताळणी करणं कसं शक्य होईल याबाबत माहिती घेऊन तज्ज्ञांच्या विचाराने निर्णय घेतीलच असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारकडून तुर्त मंदिरांबाबतीतच्या निर्णयावर स्थगिती देण्यात आली आहे. मंदिरांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मंदिरांबाबत लागू असलेले निर्बंध कायम असून थोड्या दिवसांनी याबाबतही मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
Previous Articleमहाडमधील पूरग्रस्तांना सावंतवाडीमधून मदतीचा हात
Next Article कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९९.६७ टक्के








