निपाणीसह ग्रामीण भागातील शेतकरी संकटात
वार्ताहर/ निपाणी
निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात तंबाखूचे उत्पादन गेल्या अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने घेतले जाते. यंदाही शेतकऱयांनी ऑगस्ट महिन्यापासून तंबाखू लागवड केली होती. योग्य हवामानामुळे आणि शेतकऱयांच्या कष्टाच्या जोरावर तंबाखू पीक जोमाने वाढत होते. यंदा उत्पादन क्षेत्र कमी असले तरी उत्पन्न चांगले येणार असे समाधानाचे वातावरण सर्वत्र होते. पण गेल्या आठ दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱयांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. जोमाने वाढणाऱया तंबाखू पिकाला पाणी लागल्यामुळे शेतकऱयांच्या डोक्मयावरील कर्जाचा डोंगर वाढला आहे
तंबाखू उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने तंबाखूचे उत्पन्न घेत आहेत. तंबाखूला हात आकडता घेत भाव देताना व्यापाऱयांनी नेहमीच लूट केली आहे. तरीही शेतकरी नगदी पीक म्हणून तंबाखू उत्पादनाला पहिली पसंती देतो. शासनाने अलीकडच्या काळात तंबाखू विरोधी धोरण अवलंबल्याने अडचणीत वाढच झाली आहे.
तंबाखू उत्पादनासाठी शेतकरी तरु टाकल्यापासून म्हणजेच जून महिन्यापासून कष्ट करत आहे. या काळात पडणाऱया संततधार पावसाने तरुचे देखील नुकसान झाले होते. नुकसानीकडे दुर्लक्ष करत शेतकऱयांनी मिळेल त्या भावाने तरु घेऊन तंबाखूची लागवड केली. उत्पन्न वाढीसाठी शेणखत, रासायनिक खतांची मात्रा दिली. वेळोवेळी औषध फवारणी करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न चालवला. पण परतीच्या पावसाने आठ दिवसात होत्याचे नव्हते केले. यामुळे शेतकऱयांचे उत्पादन खर्चासह मिळणाऱया उत्पन्नाचीही हानी झाली आहे. शेतकऱयांचे झालेले नुकसानीचा विचार करुन भरपाई देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱयांतून होत आहे.









