ऑनलाईन टीम / बीजिंग :
लडाख सीमेवर चिनी लष्कर आपल्या सैन्याला शस्त्रास्त्र आणि अन्नपाणी ड्रोनद्वारे नव्हे तर खेचरांद्वारे पोहचवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिनी लष्कर आपल्या सैन्याला ड्रोनद्वारे रसद पुरवत असल्याचा चीनच्या ग्लोबल टाइम्सचा दावा फोल ठरला आहे.
ग्लोबल टाइम्सने आता अलीकडच्या एका लेखात म्हटले आहे की, तिबेटमधील रुतोंग काऊंटी परिसरामध्ये तिबेटी मिलिशिया सैनिकांना रसद पुरवण्यासाठी चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मीचे सैनिक काम करत आहेत. अधिक उंचावर, कठीण परिस्थितीमध्ये सामान पोहचवण्यासाठी व्यवहारिक दृष्टीकोनातून खेचरं आणि घोड्यांचा वापर ते करत आहेत.
यापूर्वी या वृत्तपत्राने चिनी लष्कर ड्रोनद्वारे सैन्याला रसद पुरवत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याचे एकही वृत्त अथवा व्हिडिओ समोर आला नव्हता.









