बेंगळूर/प्रतिनिधी
अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात आदित्य अल्वा यांच्या अटकेवरील अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
न्यायमूर्ती आरएफ नरिमन आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याच्या जमीन अर्जावर सुनावणीस नकार दिला. दरम्यान आदित्य अल्वा अभिनेता विवेक ओबेरॉयच्या पत्नीचा भाऊ आहे.
फौजदारी खटला संपविण्याची विनंती
अॅडव्होकेट निशांत पाटील यांच्यामार्फत अल्वा यांनी सर्वोच्च न्यायालयाला अटकपूर्व जामीन मंजूर करुन त्याच्यावरील फौजदारी खटला संपविण्याची विनंती केली. परंतु न्यायमूर्तींनी जामीन मंजूर करण्याबाबतच्या सुनावणीस नकार दिला.









