बेंगळूर
औषध क्षेत्रातील कंपनी डॉक्टर रेड्डिज लॅबरोटरी यांनी अलीकडेच जर्मनीमधील निम्बस हेल्थचे अधिग्रहण केले असल्याची माहिती आहे. यासंदर्भात कंपनीने निम्बस हेल्थसोबत करारही केला असल्याचे सांगितले आहे. निम्बस हेल्थ ही जर्मनीमध्ये आपला व्यवसाय करते. तेथे ती किरकोळ औषध विक्रीच्या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. यासंदर्भातला व्यवहार लवकरच पूर्ण केला जाणार असल्याचे रेड्डीज लॅबरोटरीकडून सांगण्यात आले आहे.









