प्रतिनिधी / सातारा
गेल्या 20 वर्षांपासून वन्यजीव संवर्धन व संशोधनात अग्रेसर राहिलेले साताऱयात वन्यजीव संरक्षक व संशोधक डॉ. अमित सय्यद यांना आंतरराष्ट्रीय व्हीडी गुड या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांना बेस्ट रिसर्चर ऍवॉर्डने सन्मान केला आहे. वन्यजीव संवर्धन, वृक्षारोपण, वन्यजीव संशोधन, आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर शिकार विरोधी पथक यामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. तर वन्यजीव संशोधन क्षेत्रामध्ये आजपर्यंत त्यांनी भारतामधून 10 नवीन प्रजातींचा शोध लावला आहे.
बेस्ट रिसर्चर ऍवॉर्डचे वितरण 20 ऑक्टोबर रोजी हैद्राबादमध्ये होणार होते. मात्र, कोविड स्थितीमुळे हा कार्यक्रम रद्द झाला. संस्थने मग सन्मानित व्यक्तींना सन्मानचिन्ह पोस्टामार्फत पाठवले. डॉ. सय्यद यांना हे ऍवॉर्ड पोस्टाने घरी आले असून त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते त्यांना ते प्रदान करण्यात आले. हे सन्मानचिन्ह त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते स्वीकारल्याचा वेगळा आनंद मिळाल्याची प्रतिक्रिया डॉ. सय्यद यांनी व्क्त केली आहे.
डॉ. सय्यद हे गेली 20 वर्षे वन्यजीव संवर्धन तसेच संशोधनामध्ये अग्रनिय राहिले आहेत. 2000 सालापासून त्यांनी वाईल्ड लाईफ प्रोटॅक्शन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरु आहे. लोकवस्तीत निघालेले साप, जखमी पक्षी, माकड, कोल्हे, लांडगे, तरस, मगरी, बिबटे अश्या सर्व प्राण्यांना त्यांनी त्यांच्या कौशल्याने सुखरूप पकडून वन्यविभागामार्फत पुन्हा निसर्गात सोडण्याचे काम केले आहे. अनेकांना वन्यजीव संरक्षणाचे प्रशिक्षण दिले असून साताराच नव्हे तर संपूर्ण भारतभरात ही संस्था कार्य करत असून हरियानापासून तामिळनाडू पर्यंत या संस्थेचे सर्वत्र मेंबर्स आहेत.
डॉ. सय्यद यांनी वन्यजीव संशोधन क्षेत्रामध्ये आजपर्यंत त्यांनी भारतामधून 10 नवीन प्रजातींचा शोध लावला असून अजून बऱयाच नवीन प्रजातींची शोध मोहीम भारतात सर्वत्र सुरू आहे. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेवून अमेरिकेतील एआरसी संस्थने त्यांची वन्यजीव संशोधक म्हणून नियुक्ती केली आहे. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, लंडनमधील नामांकीत संशोधक डॉ. सय्यद यांच्या बरोबर आज कार्यरत आहेत. त्यांची वन्यजीव संदर्भात आजपर्यंत 3 पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.









