डेहराडून / वृत्तसंस्था
2018 मध्ये देशभरात गाजलेल्या डेहराडून बलात्कार प्रकरणी येथील विशेष पोक्सो न्यायालयाने मुख्य आरोपीला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याचे नाव सरबजीत असे आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अल्पवनीय असल्याने त्यांना बालसुधारगृहात अडीच वर्षे ठेवण्याचा आदेशही देण्यात आला.
2018 मध्ये येथील एका शाळेत एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर साऱया देशात संतापाची लाट उसळली होती. आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत प्रकरण सादर करण्यात आले. तथापि तीन आरोपी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर बालगुन्हेगारी न्यायालयात कारवाई करण्यात आली. बालगुन्हेगार न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. तथापि, मुख्य आरोपीलाविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने आता या अल्पवयीन आरोपींनाही बालसुधार प्राधिकारणासमोर शरणागती पत्करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना अडीच वर्षे सुधारगृहात काढावी लागणार आहेत.
अल्पवयीन मुलीवर शाळेच्या वसतीगृहातच बलात्कार करण्यात आला होता. मात्र शाळा व्यवस्थापनाने ही बाब एक महिनाभर गुप्त ठेवली होती. पुढे या पिडीतेने आपण गरोदर असल्याची तक्रार केल्यानंतर तिचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात करण्यात आला. या प्रकरणात लता. दीपक आणि तन्नू या तीन आरोपींना प्रत्येकी 9 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे तिन्ही आरोपी शाळेच्या व्यवस्थापनाशी संबंधित आहेत.








