प्रतिनिधी /बेळगाव
येथील मार्केट पोलीस स्टेशनजवळ खडेबाजार येथे रस्त्याच्या मधोमध डेनेजवर सिमेंट काँक्रीटचे आच्छादन करण्यात आल्याने रहदारीला अडचण निर्माण झाली आहे. डेनेज ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे.
त्यामुळे रस्त्याच्या मधोमध डेनेजवर करण्यात आलेले आच्छादन हटवून झाकण बसवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक जवळच असल्याने खडेबाजार मार्गावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात प्रवेश करण्यासाठी परगावातील नागरिक, वाहनधारक या मार्गाचा अवलंब करतात. मात्र रस्त्याच्या मधेच डेनेजवर करण्यात आलेले काँक्रीटचे आच्छादन रहदारीला अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे डेनेजवर झाकण बसवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.









