वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सलग दोन महिने गुंतवणूकदारांनी आपली रक्कम काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये डेट म्युच्युअल फंड योजनेवर विश्वास दर्शवला असल्याचे पहावयास मिळाले आहे. ऑक्टोबरमध्ये डेट म्युच्युअल फंडमध्ये जवळपास 1.1 लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. या अगोदर ऑगस्टमध्ये 3,907 कोटी, सप्टेंबरमध्ये 51,962 कोटीचा गुंतवणूकीचा आकडा होता. म्हणजेच या दोन महिन्यात गुंतवणूकदारांनी 55,869 कोटी रुपये डेट म्युच्युअल फंड योजनेतून काढले आहेत, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (एएमएफआय) यांनी सांगितले आहे.
गुंतवणूकदारांचा कल गुंतवणूक करण्यासाठी वाढला आहे. लहान टप्यातील वाढलेली गुंतवणूक ही घडामोड कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट केले आहे. फंड्सचे असेट्स अंतर्गत मॅनेजमेंट (एयूएम) सप्टेंबर महिन्यात 12.87 लाख कोटीने वधारुन ऑक्टोबरमध्ये 13.28 लाख कोटीवर आले आहे. गुंतवणुकीमधून योग्य परतावा आणि कर बचतीसाठी म्युच्युअल फंडच्या इएलएसएस योजनेत गुंतवणूक होत आहे. यामध्ये लिक्विड फंड्स डेट योजनेमध्ये सर्वाधिक गुंतवणूक लिक्विड फंड्सच्या वर्गवारीत आली आहे. यात सर्वाधिक 19,583 कोटींची गुंतवणूक आली असून सोबत शॉर्ट डय़ूरेशन फंड्समध्ये 15,156 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.









