सीरिजमध्ये सुरवीन चावलाही दिसणार
सेक्रेड गेम्ससारख्या सीरिजद्वारे नेटफ्लिक्सने कनिष्ठ आणि मध्यमवर्गाच्या प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. नेटफ्लिक्ससाठी आता बॉम्बे फेब्ल्स नावाचे प्रॉडक्शन हाउस ‘डीकपल्ड’ ही सीरिज घेऊन येत आहे. ही सीरिज उच्च मध्यमवर्गाला डोळय़ासमोर ठेवून तयार केली जाणार असल्याचे समजते. या सीरिजमध्ये आर. माधवन आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत आहेत.
ही सीरिज मुख्यत्वे घटस्फोटाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या एका विवाहित जोडप्याची कथा दर्शविणार आहे. सीरिजमध्ये माधवन लेखकाच्या भूमिकेत आहे. तर सुरवीन इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून दिसणार आहे. दोन्ही व्यक्तिरेखांची घटस्फोटापर्यंत पोहोचण्याची कारणे वेगवेगळी आहेत. माधवन आणि सुरवीन यांनी आतायर्पंत 45 दिवसांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. कामयाब आणि रुही अफजाना यासारखे चित्रपट तयार केलेले हार्दिक मेहता या सीरिजचे दिग्दर्शक आहेत. या सीरिजचे दिल्ली, गुरुग्राम तसेच गोव्यात चित्रिकर पार पडले आहे.









